अन्नछत्र मंडळातील सेवेकरी व कर्मचाऱ्यानां
दिवाळी किराणा साहित्याचे वाटप
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळातील सेवेकरी व कर्मचाऱ्यानां दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याचे वाटप गुरुवारी करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या यशस्वी वाटचालीसाठी सेवेकरी व कर्मचाऱ्याचां बहुमोल वाटा आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने त्यांना फराळासाठी लागणारे किराणा साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी, सौरभ मोरे, वैभव मोरे, रोहन शिर्के, प्रवीण देशमुख, स्वामिनाथ बाबर, प्रवीण घाडगे, सनी सोनटक्के, बाळासाहेब घाडगे, महादेव अनगले, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, गोटू माने, शुभम सावंत, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments