MH-13 EY मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 17, 2025

MH-13 EY मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 MH-13 EY मालिकेतील आकर्षक नोंदणी 

क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या MH-13 EY मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालयसोलापूर येथे सुरु करण्यात आली आहे. वाहनांची नवीन मालिका सुरु होण्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ही पूर्वनियोजनात्मक प्रक्रिया राबविण्यात येत असून नागरिकांना पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावायासाठी विहीत शुल्कासह अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारीसोलापूर यांनी केले आहे.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे: 

दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते सायं. 4.00 या वेळेत कार्यालयीन दिवशी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत क्र.16 अन्वये जारी केलेला डीडीपत्त्याचा पुरावाआधार लिंक झालेला मोबाईल क्रमांकओळखपत्र व पॅनकार्ड याच्या साक्षांकित प्रती अनिवार्य आहेत. डीडी फक्त "Dy R.T.O. SOLAPUR" यांच्या नावे नॅशनलाइज/शेड्यूल्ड बँकेचा असावा.

लिलाव प्रक्रिया: 

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 5.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. यादीतील अर्जदारांनी 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात लिलावासाठीचा डीडी सादर करावा. लिलावासाठीचा डीडी रु. 1000/- पेक्षा जास्त रकमेचा असावा. 

- 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रक्कमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरीत केला जाईल.

महत्वाचे निर्देश: 

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. 

राखीव क्रमांकासाठी अर्ज केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन सादर करून नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. 

कोणत्याही परिस्थितीत राखीव क्रमांकासाठी दिलेली फी परत करता येणार नाही किंवा समायोजन करता येणार नाही.

MH-13 EY मालिकेचे वेळापत्रक (दुचाकी वाहनांसाठी): 

- 20 ऑक्टोबर 2025 – तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकृती (वेळ: सकाळी 11 ते सायं. 4) 

- 20 ऑक्टोबर 2025 – सायं. 5.00 वा. डबल आलेल्या अर्जांची यादी जाहीर 

- 24 ऑक्टोबर 2025 – दुपारी 2.00 पर्यंत लिलावासाठीचे डीडी सीलबंद लिफाफ्यात स्वीकृती 

- 24 ऑक्टोबर 2025 – दुपारी 4.00 वाजता लिलाव प्रक्रिया

 

          नागरिकांनी या प्रक्रेत सहभागी होऊन पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करावाअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारीसोलापूर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages