Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी योगदान द्यावे : माजी सुभेदार काशीद

 विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी योगदान द्यावे : माजी सुभेदार  काशीद





सोलापूर (कटुसत्य वृत्त):-मी कारगिल, लडाख आणि इतर युद्धांमध्ये सुभेदार म्हणून सहभाग नोंदविला होता. शिक्षक म्हणूनही काम केले आहे. देशाच्या संरक्षणासाठी सैनिक जीवाची बाजी लावतात. विद्यार्थ्यांनी देश सेवेसाठी योगदान देण्याची गरज आहे, असे आवाहन भारतीय लष्करातील माजी सुभेदार रावसाहेब काशीद यांनी केले.
          श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आज लिमयेवाडी येथील सोनामाता विद्यालयात माजी सैनिकांसमवेत दिवाळी उपक्रम राबविण्यात आला. १५० विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आला.  त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर हणमंत शेट्टी, सरकारी वकील ॲड. शितल डोके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रुती गांधी, सोना माता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा अत्रे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
         माजी सुभेदार काशीद पुढे म्हणाले, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने माजी सैनिकांसमवेत दिवाळी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. याबद्दल समाधान वाटते. प्रतिष्ठानने गेल्या दहा वर्षात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रम घेतले. त्यांचे कार्य गौरवास्पद आहे.
          श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा पाचवा कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिष्ठानने विद्यार्थी दत्तक योजना, गोरगरीब वंचितांसाठी मदत, वृक्षारोपण,
अन्नदान , शालेय साहित्य वाटप,  सेनेटरी पॅड वितरण, स्टीलची पाणी टाकी प्रदान यासह अनेक उपक्रम घेतले आहेत, अशी माहिती संस्थापक महेश कासट प्रास्ताविकात दिली.
         सुत्रसंचलन रमेश बेडगे यांनी केले तर आभार जयश्री दोडमनी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनूश्री कासट, अक्षता कासट, शिला तापडिया, शुभांगी लचके, प्रियंका जाधव, अर्चना बंडगर, संतोष अलकुंटे, अभिजित व्हनकळस, सुरेश लकडे, रेखा फुलारी, अनुराधा जोशी, विजया चव्हाण, राजुदास पवार, अनिल पांढरे, सारिका पवार, जगदेवी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments