Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री सिद्धेश्वर प्रशालेच्या मुलींच्या कबड्डी संघास उपविजेतेपद

 श्री सिद्धेश्वर प्रशालेच्या मुलींच्या कबड्डी संघास उपविजेतेपद




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 17 वर्षे वयोगट शहर स्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री सिद्धेश्वर प्रशालेच्या मुलींचा संघ उपविजेता  ठरला.
सदर संघाचे कर्णधारपद जबीन मुल्ला हिच्याकडे होते तर  तस्मिया पटेल, सौंदर्या कोणदे, दिव्या कोळी, मयुरी सोनकडे, श्रद्धा चाबुकस्वार, मोहिनी सोनकडे,अंकिता टिकूरे, स्नेहा सोनकडे, लक्ष्मी देवकाते, प्रतीक्षा माने, चतुर्थी विजापुरे या मुलींच्या संघाने ही कामगिरी केली.
जबीन मुल्ला या विद्यार्थिनीची विभागीय  चाचणीसाठी निवड झाली आहे.
या घवघवीत यशाबद्दल यशस्वी खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सिताराम भांड यांचे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अण्णाराज काडादी, शालेय शिक्षण समितीचे सदस्य सिद्धाराम  चाकोते , गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, समीर सलगर श्री सिद्धेश्वर शिक्षण संकुलाचे समन्वयक संतोष पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक काशिनाथ आकाशे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महासिद्ध मेसे व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments