Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय ज्युनिअर हॉलीबॉल स्पर्धेचे टेंभुर्णीत भव्य उदघाटन

 राज्यस्तरीय ज्युनिअर हॉलीबॉल स्पर्धेचे टेंभुर्णीत भव्य उदघाटन




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  
शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संत रोहिदास आश्रम शाळा, टेंभुर्णी येथे ४४ वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मुले व मुली शुटिंग (हॉलीबॉल) अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन खा. धैर्यशीलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल २५ मुला-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धा उत्साहात सुरू आहे.

उद्घाटनप्रसंगी खा. मोहिते-पाटील यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत, “खेळातून संघभावना, शिस्त व जिद्द वाढीस लागते. विजयापेक्षा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे सांगून स्पर्धेचे औचित्य साधले.

प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक कैलास सातपुते यांनी शिक्षणापासून वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव शुगरचे कार्यकारी संचालक अमर पाटील होते. यावेळी शिंदे गटाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे, तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, नेते प्रमोद कुटे, उपसरपंच सतीश नवसे, जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, माजी सरपंच परमेश्वर खरात, युवा नेते यशपाल लोंढे, तसेच विठ्ठल होणमोरे, नागनाथ बंगाळे, प्रशांत साळे, रणजित काळे, पंडित पाटील, तुकाराम डोके, सोमनाथ ताबे, सचिन होदाडे, शैलेश ओहोळ, गौतम कांबळे, विजय कोकाटे, बाळासाहेब ढगे, केशव गायकवाड, रामकृष्ण काळे, गणेश शिंदे, विजय पवार, रामचंद्र टकले, भास्कर सोनवणे, भारत माने यांसह मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर खेळाडूंनी रोमांचक सामन्यांना सुरुवात केली असून परिसरात क्रीडामहोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments