प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांना भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,सदस्य पुणे बोर्ड, संस्थापक श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूर यांना भारत सरकार यांचे वतीने राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे,संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे,डॉ गणपतराव मोरे विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे,औदुंबर उकिरडे पुणे बोर्ड अध्यक्ष, सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांनी गेली वीस वर्षे अनेक शैक्षणिक,सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जिल्हा परिषद,पुणे उपसंचालक,मुंबई मंत्रालय येथे अनेक शिक्षक बांधवांना न्याय मिळवून दिले आता पर्यंत 2000 शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले या सर्व बाबींचा विचार करून त्यांना भारत सरकार यांचे वतीने राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला या बद्दल राज्यामध्ये सर्व स्तरामधून कौतुक करून शुभेच्छा वर्षा होत आहे.
0 Comments