Hot Posts

6/recent/ticker-posts

कुरबावी ते दहिगाव रस्ता मृत्यूचा सापळा; प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, नागरिकांची मागणी

 कुरबावी ते दहिगाव रस्ता मृत्यूचा सापळा; प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, नागरिकांची मागणी




नातेपुते (कटूसत्य वृत्त):-  

नातेपुते ते बारामती या दोन्ही मोठ्या शहरांना जोडणारा आणि शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा असलेला दहीगांव कुरबावी रस्ता सध्या धोकादायक अवस्थेत आहे. रस्त्यावरील दुरवस्था आणि अरुंदपणा यामुळे वाहतुकीला मोठा प्रश्न निर्माण झाला असून, अपघात होण्याची भीती वाढली आहे.या रस्त्याचा वापर दररोज शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने करतो. शेतमाल वाहून नेणाऱ्या वाहनांना त्रास होतो व वेळ वाया जातो. यामुळे शेतमालाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.चंद्रपुरी ते कुरबावी रस्त्याची परिस्थितीही बिकट आहे, विशेषतः पाटील वस्ती ते कुरबावी मार्गावर मोठे खड्डे पडले असून, लहान मुलं शाळेत ये-जा करताना धोक्यात असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतहीच चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.नातेपुते ते बारामती मार्गाचा रस्ता जास्त वाहतुकीसाठी खूप अरुंद आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण आणि त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्ग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागा आणि जिल्हा प्रशासनाला या रस्त्यांच्या सुधारणा तातडीने करण्याची मागणी केली आहे.प्रशासनाने तातडीने ही दखल घेतली पाहिजे, नाहीतर अपघातांमध्ये वाढ होण्याची शक्यता व प्रवाशांच्या आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे नागरिक सांगत आहेत.छगन रूपनवर, प्रशांत रूपनवर,नाथा रूपनवर, राहुल रूपनवर, दत्ता घाडगे, सागर मोरे, नितीन रूपनवर,अजित चोरमले व ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments