Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महापालिकेचे नागरिकांना आवाहन; अनधिकृत बांधकामे, अडथळे तातडीने हटवा

 सोलापूर महापालिकेचे नागरिकांना आवाहन; अनधिकृत बांधकामे, अडथळे तातडीने हटवा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “माझं सोलापूर-स्वच्छ सोलापूर, माझं सोलापूर-सुंदर सोलापूर” या वार्षिक अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध अनधिकृत व अडथळा निर्माण करणाऱ्या संरचनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील वीज वाहिन्या, टेलिफोन पोल, गटार, नाले, जलवाहिन्या, ड्रेनेज पाईपलाइन यांसह रस्त्यावर ठेवलेले साहित्य, मातीचे ढिगारे, बांधकाम साहित्य, अडजॉर, जडजंग यांसारख्या वस्तूंमुळे पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह अडथळीत होतो, ज्यामुळे पाणी साचून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी ताबडतोब अशा अडथळ्यांचे स्वतःहून निरसन करावे. अन्यथा, महानगरपालिका पुढील १० दिवसांत विशेष मोहीम राबवून संबंधित वाहने, साहित्य तातडीने हटवून त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करणार आहे. तसेच याबाबतचे वाहनधारक व व्यक्तींवर कायदेशीर कारवाईही करण्यात येईल.
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व नाले व गटारे स्वच्छ, प्रवाही आणि अडथळेमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी स्वखुशीने अडथळे हटवून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहील.”
Reactions

Post a Comment

0 Comments