Hot Posts

6/recent/ticker-posts

हॉटेल अजिंक्यतारा यांच्या वतीने धान्य कीट व जनावरांना चारा वाटप

 हॉटेल अजिंक्यतारा यांच्या वतीने धान्य कीट व जनावरांना चारा वाटप




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील प्रसिद्ध हॉटेल अजिंक्यतारा यांच्या वतीने सोलापूरातील पूर बाधितांना ५०० धान्य कीट व जनावरांना चारा वाटप करण्यात आला.

सोलापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल अजिंक्यतारा यांच्यावतीने सोलापूरातील पूर बाधितांना मदतीचा हात देण्यात आल्याने सोलापूरकरातून स्वागत व समाधान व्यक्त होत आहे. सदरचे कीट वाटप हॉटेलचे संचालक अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली संपन्न झाले.

याकामी संचालक सिद्धेश्वर मोरे, व्यवस्थापक दशरथ संकपाळ, अंकुश हारकुड, सचिन परिट, अंबादास कदम, बिरप्पा वागदरी, तौफिक एरंडे, शिवम ढेपे, काशिनाथ लोंढे, लक्ष्मण राठोड आदिजणांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments