खास दिवाळीची खरेदी आणि लग्नाचा बस्ता यामुळे व्हि. आर. पवार मध्ये महिलांची प्रचंड गर्दी - राजेश पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युवती मध्ये साड्यांची क्रेझ सध्या वाढलेली दिसत आहे पारंपरिक साड्यांनाच आधुनिक लुक देणाऱ्या काठपदर साड्यांची क्रेज आजही युवतीमध्ये प्रचंड लोकप्रिय असताना दिसत आहे. आणि त्यात डिझाईन वर्कच्या साड्या आल्या. ब्रायडल शालू, रेशमी, सिल्क आणि प्रिंटेड साड्यांची लोकप्रियता आजही युवती मध्ये कायम असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.
चाटी गल्ली येथील व्ही आर पवार यांच्या शोरूम मधील ही आजची गर्दी आहे ती दिवाळी आणि लग्न बस्ता खरेदीची, कारण तरुणींना पारंपारिक साड्यांना आधुनिक टच दिलेला डिझाईन हवा असतो त्यांच्या मनातील साडी ही फक्त व्हि.आर. पवार यांच्याकडेच मिळते अशी खात्री तरुणींना वाटतो त्यामुळेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसत आहे.
खास करून व्हि. आर. पवार यांच्याकडे सुटिंग - शर्टींग, धोतर, नवरीचा शेला, परकर, घुंगट यासह आहेराच्या साड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे जरी, काठपदर, पैठणी, वर्क साडी पोटा गदवाल इरकल या साड्या सह ब्रायडल शालू आणि रेशमी साड्या सहा हजारापासून उपलब्ध आहे.
गर्दी टाळण्यासाठी व आवडीची साडी घेण्याकरिता तसेच लग्नाचा बस्ता खरेदीसाठी सोलापूर, लातूर, धाराशिव येथील आमचे आदरणीय ग्राहकांनी सकाळी 11 वाजताच यावे असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.
0 Comments