नवीन चेंबर दालनाचा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील सोहळे गावचे सुपुत्र अॅड. महेश जगताप यांच्या सोलापूर जिल्हा न्यायालय आवारातील नवीन चेंबर दालनाचा शुभारंभ राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.
या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कायदे व्यवसायाशी संबंधित वरिष्ठ वकील, सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला उत्साहवर्धक आणि आपुलकीचा माहोल लाभला.
राजन पाटील यांनी शुभारंभ प्रसंगी बोलताना अॅड. महेश जगताप यांच्या कार्यनिष्ठेचे कौतुक केले. “गावागावातील तरुणांनी शिक्षण, संघर्ष आणि प्रामाणिकतेच्या जोरावर न्यायव्यवस्थेत योगदान द्यावे, हीच खरी समाजसेवा आहे,” असे ते म्हणाले.
ऍड. महेश जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत सांगितले की, “या नवीन चेंबरद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत न्याय आणि सल्ला पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.”
यावेळी तानाजी गुंड, अनिल कादे व प्रकाश चवरे उपस्थित होते.
0 Comments