श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने
दिपावली निमित्त फराळ किट वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेच्या लाभार्थ्यांना आपुलकी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व नव भारत मित्र मंडळ, कारंजा चौक यांच्या वतीने दिपावली निमित्त फराळ किट देण्यात आले.
दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने समर्थ महाप्रसाद सेवेच्या लाभार्थ्यांना किट आपुलकी संस्थेकडून न्यासास सुपूर्त करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, आपुलकी संस्थेचे विशाल (मुन्ना) राठौर, अविराज सिद्धे, अप्पू कलशेट्टी, शैलेश राठौर, अंबादास निंबाळे, अनिल बिडवे, अमर पाटील, महेश लोकापुरे, अमोल कोळी, विष्णू शिंपाळे, प्रकाश टाके, रुपेश कपुरे, सलीम हगलदिवटे, समर्थ आळगी, राहुल राठौर, संतोष राठौर, बालाजी सुरवसे, नितीन कटारे, शिवराज स्वामी, मल्लय्या स्वामी, आर्यन राठौर, विराज राठौर, आशिष राठौर, शिवलिंग कलबुर्गी, शक्ती पाटील, अमित पाटील, सुरेश कतनाळी यांच्या सह मैनुद्दीन कोरबू, सौरभ मोरे, भारत पाटील, बाळासाहेब पोळ, निखील पाटील, योगेश कटारे, प्रवीण घाडगे, गोटू माने यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments