सोलापूर जिल्हा संपर्क मंत्रीपदी ना.दत्तामामा भरणे यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनील तटकरे यांनी नुकतेच एक पत्र काढले असून त्यानुसार वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर, धाराशिव, जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीने कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे .
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यासाठी कृषी मंत्री भरणे यांनी या चार जिल्ह्यांमध्ये जाऊन 10 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या आढावा बैठका घ्याव्यात या बैठकांना जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष आजी-माजी आमदार खासदार जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर जिल्हा कार्यकारिणी फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य यांना निमंत्रित करण्याबाबत जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आगामी निवडणुकीसाठी व जास्तीत जास्त यश मिळवण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याच्या सूचनेचे पत्र पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे या निवडीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा राष्ट्रवादीचे नेते मा.नगरसेवक तोफिक भाई शेख यांनी या निर्णयाचे स्वागत केले. आणि दूरध्वनी वरून दत्तात्रय मामा भरणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले.
0 Comments