पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सोलापूर महसूल विभागाचा सामाजिक उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 10, 2025

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सोलापूर महसूल विभागाचा सामाजिक उपक्रम

 पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सोलापूर महसूल विभागाचा सामाजिक उपक्रम



 ४०० शैक्षणिक साहित्य किट्स सुपूर्द

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- अलीकडील काळात सीना नदीला आलेल्या पूरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली होती. या नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचे तसेच नदीकाठावरील गावांमधील शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यही नष्ट झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महसूल विभागातील कर्मचारी बांधवांनी सामाजिक भान ठेवून पुढाकार घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण ४०० शैक्षणिक साहित्य किट्स (वह्या, पेन, पेन्सील व कंपास) तयार करण्यात आले.

आज दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सदर साहित्य किट्स अपर जिल्हाधिकारी (मदत कक्ष) मोनिका सिंह यांचेकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) अंजली मरोड, तहसीलदार (सर्वसाधारण) श्रीकांत पाटील हे मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी शंतनु गायकवाड, अमर भिगे, गजानन गायकवाड, सुभाष मोपडे, गंगाधर हाके, संदीप माने, महालिंग लोढे, निर्मल आगरखेड, विलास रणसुभे,  रणजीत म्हेत्रे, लक्ष्मीकांत आयगोळे, अजीत कांबळे, विरु सुलगडले, मुदसर मगरूळकर, रवि नष्टे,  विलास म्हेत्रे, प्रदीप शिंदे, ज्ञानेश्वर कराळे झारी, उमेश काळे, विजय इजेवाढ, समाधान राऊत, अक्षय गायकवाड, अविनाश स्वामी, वैभव मिसाळ, सजय मसने, काशीनाथ बुरांडे, दत्तात्रय कोळेकर, श्रीमती पदमा यादव, दिनानाथ पवार यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनरारंभासाठी आवश्यक साहित्य मिळाले असून, प्रशासनाच्या सामाजिक संवेदनशीलतेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. महसूल विभागाच्या एकात्मिक सहभागातून समाजाभिमुख कार्याची प्रेरणा मिळत असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages