Hot Posts

6/recent/ticker-posts

'सोलापूर शहर परिसराचा पारा ३५.१ अंश सेल्सिअसवर'; वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे नागरिक हैराण...

 'सोलापूर शहर परिसराचा पारा ३५.१ अंश सेल्सिअसवर';

 वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे नागरिक हैराण... 


 सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या ऑक्टोबर हीटची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा यामुळे सोलापुरातील नागरिक हैराण होत आहेत. सोलापूर शहर व परिसरात आज (शुक्रवार) ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  अतिवृष्टी आणि महापूर ओसरल्यानंतर तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहात होता. आज पहिल्यांदा सोलापूरचे तापमान ३५ अंश सेल्सिअस पार झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होताना आढळली आहे. सोलापुरात बुधवारी ३३.६ तर गुरुवारी ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्यंतरी सोलापुरात किमान तापमानाचा पारा २० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने वातावरणात गारवा व थंडी सुरू झाली होती.

आता कमाल तापमानासोबत किमान तापमानाचाही पारा वाढल्याने रात्री वातावरणातील गारवा व थंडी घटली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा त्रास दिवस व रात्री अशा दोन्ही वेळा होऊ लागला आहे. सोलापुरात दिवाळीनंतर थंडी जाणवण्यास सुरवात होते.

यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत उन्हाचा कडाका कायम राहील, वातावरण उष्ण व उकाडा राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments