Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रारूप प्रभाग रचनेवर ३८ हरकती दाखल

 प्रारूप प्रभाग रचनेवर ३८ हरकती दाखल
सोलापूर,(कटुसत्य वृत्त):- 
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत विविध
प्रभागांमधून ३८ हरकती व सूचना महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी मात्र तब्बल २२ हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीनेही प्रभागासंदर्भात हरकत नोंदविण्यात आली. 
सोलापूर महापालिका  सार्वत्रिक निवडणुकीसाठी  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना ३ सप्टेंबर रोजी जाहीर केली होती. १५ सप्टेंबरपर्यंत ३८ जणांनी याला हरकत घेतली आहे. काही जणांनी सूचनाही केल्या आहेत. या १३ दिवसातील हरकती सूचनांवर १६ ते २२ सप्टेंबरच्या कालावधीत जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे..
यानंतर २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभागरचना नगरविकास विभागास सादर करणार आहे. २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्राधिकृत अधिकान्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना नगर विकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिध्द करणार आहे. सोमवारी शेवटच्या दिवसापूर्वी महापालिका निवडणूक कार्यालयाकडे विविध प्रभागातून १६. हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. शेवटच्या दिवशी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांनी शहरातील विविध प्रभागातील मुद्देनिहाय हरकत सादर केली आहे तसेच यामध्ये सुधारणा होण्यासंदर्भात देखील नमूद करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या आधारित विसंगतीवर शहरातील ९ लाख ५० हजारावरून वाढलेली १२ लाख ५० हजार लोकसंख्येचे वर्णन करण्यात आले आहे. यामुळे नगरसेवकांची संख्या वाढणार
असल्याचे नमुद केले आहे. शिवाय या हरकतीत हरवा भागावर अन्याय प्रभागाचे असमतोल क्षेत्रफळ, मतदार संख्या व आरक्षण गोंधळ राजकीय हेतूंचा संशय, सिंगल वॉर्ड प्रणालीची मागणी. पंचवार्षिक फेरबदल, जनगणना व नगरसेवकांची संख्या यावर मुद्देसूद वर्णन करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, चंद्रकांत सोनवणे, समीर शेख, अमोल जगताप, ज्ञानेश्वर जग रिवाज अहमद मोमीन, अक्षय कोथिंबिरे, राहुल काटे, सुहास म्हात्रे, नितीन भिसे, धुळप्पा आळंद रतिकांत कमलापुरे, अंबादास दोरणाल निलेश लच्छूवाले, मिलिंद क्षीरसागर, अंजली वलसा अश्फाक बागवान, मनोहर सपाटे,नटराज कांबळे, मनीष गायकवाड, प्रा. भोजराज पवार अशा २२ जणांनी शेवटच्या दिवशी प्रभाग रचनेवर आपली हरकत नोंदविली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments