Hot Posts

6/recent/ticker-posts

'स्वच्छतादूत' रवी पवार बनले पुणे महापालिकेचे उपायुक्त

 'स्वच्छतादूत' रवी पवार बनले पुणे महापालिकेचे उपायुक्त


सोलापूर,(कटुसत्य वृत्त):- 
महापालिकेत केवळ दहा महिन्यांत विक्रमी कामगिरी करून स्वच्छतेचा नवा पॅटर्न निर्माण करणारे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महापालिकेत उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. शासनाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत.
अतिरिक्त आयुक्त रवी पवार हे गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरला सोलापूर महापालिकेत रुजू झाले होते. दहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली. शहरात स्वच्छता मोहीम यशस्वी
करून दाखवली. सोलापुरात प्रथमच विद्यार्थ्यासाठी प्लॉग न काढण्याची कल्पना त्यांनीच आणली, सोलापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पान, गुटखा खावून रस्त्यावर भुंकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबवली. सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत अनुकंपा आणि लाड कमिटीच्या वारसांना नियुक्तीचे आदेश दिले. घनकचरा व्यवस्थापन विभागाची नेटकी घडी बसवली. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेत प्रथमच प्रशिक्षण देऊन जबाबदारीची जाणीव करून दिली. लोकाभिमुख अधिकारी म्हणून अल्पावधीत त्यांनी लौकिक मिळवला. प्रशासकीय कारणास्तव त्यांना पुणे महापालिकेतील रिक्त जागेवर बोलावून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर महापालिकेत दहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. या कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभले. अधिकारी आणि कर्मचारी यांचे टीमवर्क असल्याने स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवता आली. इतर सर्व योजनादेखील चांगल्या पध्दतीने कार्यान्वित आल्या. सोलापुरात वेगळे काहीतरी करण्याचे समाधान लाभले, अशी भावना अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी व्यक्त केली.
Reactions

Post a Comment

0 Comments