Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. यशवंत कुलकर्णी यांना डेक्कन शुगरचा ‘सर्वोत्तम कामगिरी' पुरस्कार जाहीर

 डॉ. यशवंत कुलकर्णी यांना डेक्कन शुगरचा ‘सर्वोत्तम कामगिरी' पुरस्कार जाहीर


श्रीपूर (कटुसत्य वृत्त):-  येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची प्रतिष्ठेच्या 'सर्वोत्तम कामगिरी पुरस्कारासाठी' निवड झाली आहे. साखर उद्योगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट स
असोसिएशन इंडिया, पुणे यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्कार समारंभ २२ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे होणार आहे. या समारंभासाठी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक डॉ. सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, विस्मा संस्थेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, एसटीएआयचे अध्यक्ष संजय अवस्थी, तसेच एसआयएसएसटीएचे अध्यक्ष एन. चिन्नप्पन यांसह साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कारखान्याचे चेअरमन मा. आ


. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ, अधिकारी, कामगार वर्ग तसेच पांडुरंग परिवार यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments