Hot Posts

6/recent/ticker-posts

रेशन दुकानदारावर परवाना रद्दची कारवाई

 रेशन दुकानदारावर  परवाना रद्दची कारवाई
सोलापूर,(कटुसत्य वृत्त):-     
रेशन दुकानात ग्राहकांना धान्य वाटपावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळून आल्याप्रकरणी मोदी परिसरातील २५ या उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानदाराला दोषी धरून त्याच्याकडील अनामत रक्कम जप्त करीत त्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. राजकीय दबाव झुगारून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी ही कारवाई विभागातील केली.
यापूर्वीही ब विभागातील  साधना सर्व व्यवसाय व २४ व क विभागातील निकिता सर्व व्यवसाय
क १०४ या दोन दुकानांवर पडोळे यांनी कारवाई केली होती. आता ड विभागातील उत्तर भाग ग्राहक
सोसायटीच्या ड २५ या दुकानाला दणका दिला आहे.
मोदी परिसरातील ड २५ या उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानात धान्य वाटपावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळला होता. यात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल रेशन दुकानाचा परवाना रद्द का करू नये, अशी २४ तासात उत्तर देण्याची नोटीस अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांनी बजावली होती. परंतु दोषी दुकानदाराने २४ तास उलटले तरी नोटीसीला उत्तर दिले नव्हते. राजकीय वजन
वापरून कारवाई टाळण्याचा प्रयत्न संबंधित रेशन दुकानदारांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांनी दबावाला भीक न घालता रेशन दुकानाची अनामत रक्कम जप्त करीत परवाना रद्द करण्याची कारवाई सोमवारी केली. दरम्यान, रेशन दुकानदाराने मुदतीनंतर नोटीसीला खुलासा दिला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय खाद्य निगमकडून ज्या प्रकारे धान्य आले, त्याच प्रकारे धान्य वाटप केले असे उत्तर दिलेले आहे. यावरून त्यांना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी रेशनदुकानदारावर  कारवाई केली आहे.अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांच्या या कारवाईमुळे अन्य रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments