नेताजी प्रशालेत गणेश चित्रप्रदर्शन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत गणेशोत्सवानिमित्त कला विभागाच्यावतीने श्री गणेश चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. ४० नवोदित कलाकार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गणेशाचे चित्र रेखाटले व रंग संगतीने आकर्षक श्री गणेश चित्र रंगविले.
या प्रदर्शनाला मुख्याध्यापक. रविशंकर कुंभार, राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी , पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे , सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भगवान श्री गणेशाच्या विविध रूपांचे, भक्तिभावाचे, निसर्ग व संस्कृतीशी नाते जोडणारे तसेच सामाजिक संदेश देणारी चित्रे साकारली होती. श्रद्धा, भक्ती आणि गणेशोत्सवातील उत्साहाची अप्रतिम अभिव्यक्ती या कलाकृती दिसून आली. या स्पर्धेत गौतम कौंतम , गायत्री भैरगुंडे ,अक्षरा मडुर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक शैलेश स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments