Hot Posts

6/recent/ticker-posts

खेळामधूनही करिअर करता येते-आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे

 खेळामधूनही करिअर करता येते-आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे 




अनगर येथे तालुकास्तरीय खो -खो स्पर्धेचे उद्घाटन

अनगर (कटूसत्य वृत्त):- शाळा महाविद्यालयातून खूप अभ्यास करून करिअर  करता येतेच त्याबरोबरच खेळांमधूनही आपणाला उत्तम करिअर करता येते. यासाठी खेळावर मनापासून प्रेम करा व रोज खेळाचा सराव करा असे मत यावर्षी वर्ल्डकप  खो-खो खेळलेली व सतरा वेळा राष्ट्रीय स्तरावर खोखो खेळलेली आंतरराष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदे हिने अनगर येथील पाटील विद्यालयात  व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व मोहोळ तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदे (जानकी राष्ट्रीय पुरस्कार व राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार) व राष्ट्रीय खेळाडू किरण शिंदे या भगिनींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अश्विनी शिंदे बोलत होती.

पुढे बोलताना ती म्हणाली की खंडोबाचीवाडी (अनगर) सारख्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही पोहोचण्यासाठी या खंडोबाची वाडी या गावाने व  शाळेने दिलेल्या संस्कारामुळे मी सतरा वेळा राष्ट्रीय स्तरावर व माझी बहीण किरण शिंदे ही पंधरा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत व खेलो इंडियामध्ये सहभागी झालो आज किरण शिंदे क्रीडा विभागात सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी या पदावर बालेवाडी पुणे येथे काम करते हे केवळ खोखो वरती केलेल्या प्रेमामुळे शक्य झाले आहे.
यावेळी  किरण शिंदे हिने पाटील विद्यालयाने व क्रीडा शिक्षकांनी आपणाला जे घडवले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अश्विनी शिंदे व किरण शिंदे यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले व खो खो सामन्याचा शुभारंभ झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत ढोले हे होते तर प्रमुख पाहुणे तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण हे होते. 
यावेळी उपप्राचार्य महादेव चोपडे, पर्यवेक्षक माधव खरात 
दिगंबर पाटील, बब्रुवान बोडके, लहू वाकळे, रवींद्र बोडके, चंद्रकांत सरक, अन्वर मुलानी, सुजित पासले, डॉ. प्रशांत कुलकर्णीश्रीकांत दाढे,विलास गुंड, भारत वलगुडे, अर्चना गुंड, हरी शिंदे, पंढरीनाथ थिटे, प्रभाकर बंडगर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बब्रुवान बोडके यांनी प्रास्ताविक केले तर सत्यवान दाढे यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments