Hot Posts

6/recent/ticker-posts

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



 
करमाळा (कटूसत्य वृत्त):- गणेशोत्सवाच्या निमित्ताने गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने नेत्र तपासणी, रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तसेच अन्य तपासण्या करून नागरिकांना योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात आला. रक्तदान शिबिरात तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. एकूण ९४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी जपली.
गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत (आण्णा) ढाळे यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे सामाजिक भान निर्माण करणारा सण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच प्रेरणादायी आहे.”
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबमधील सदस्यांनी व स्थानिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Reactions

Post a Comment

0 Comments