Hot Posts

6/recent/ticker-posts

अश्विनी गंगुल यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

 अश्विनी गंगुल यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेच्यावतीने दिला जाणार यंदाचे तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार नेताजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सहशिक्षिका अश्विनी नागराज गंगुल यांना जाहीर झाला आहे.
शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता तपोरत्नं सभागृहात माजी खा. श्री ष. ब्र. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते, संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.
अश्विनी गंगुल या तंत्रस्नेही शिक्षिका असल्याने त्यांच्या प्रयत्नामुळे शाळेला दहा संगणक भेट मिळाली आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याने शाळेच्या शैक्षणिक दर्जा उंचावला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांचा खूप मोठा योगदान आहे. पेपर क्राफ्ट व हस्तकला, प्रोजेक्टचा वापर करुन अध्यापन करणे, अभ्यासाची सवय व शिस्त लावणे , चांगल्या सवयीचा विकास करणे आदी अनेक उपक्रम त्यांनी राबविले.या गेल्या दहा वर्षांपासून संस्थेच्या विविध उपक्रमात हिरहिरीने सहभाग घेतात.पालक, सहकारी शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी सलोख्याचे व आपुलकीचे संबंध आहेत. सर्वगुण संपन्न असल्याने गंगुल यांचे यंदाच्या तपोरत्नं गुणवंत शिक्षक  पुरस्कारासाठी केल्याचे निवड समितीचे सदस्य प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदींनी जाहीर केले. संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांना नुकतेच श्री होटगीश्वर चिंतामणी रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने माजी खा.श्री ष.ब्र. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते नेताजी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments