Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची परिचारक यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची परिचारक यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतीची माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
सततच्या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची द्राक्ष, ऊस, डाळींब, कांदा, मका आदी पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.
 दरम्यान आज पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, अनवली, मुंढेवाडी, रांझणी, पुळूज, पुळूजवाडी, शंकरगाव, नळी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मा.आ.प्रशांत परिचारक यांनी तहसिलदार, कृषी सहाय्यक, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
द्राक्ष बाग, डाळींब, फळ बागा व ऊसाच्या नवीन लागणीच्या क्षेत्रामध्ये खुप मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष, डाळींब, फळ बाग व ऊसाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची पाहणी केली.
मुंढेवाडी येथील रस्त्याच्या बाजूच्या चाऱ्या बुजल्यामुळे रस्त्यावरती पुर्णपणे पाणी वाहत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रस्त्याच्या बाजूच्या पाणी निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी असे सांगितले. तसेच पुळूज भागातील रस्त्यावरील छोटे पूल पावसाच्या पाण्याखाली गेलेले आहेत. तेथे नवीन पूल बांधण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावे अश्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना देण्यात आल्या.
पंढरपूर तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तरी या पिकांचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळणेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडे मा.आ.प्रशांत परिचारक हे भेटून मागणी करणार आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीष गायकवाड, पंडीतराव भोसले, राजुबापु गावडे, सुभाष मस्के, सुदाम मोरे, रतिलाल गावडे, प्रशांत देशमुख, हरीभाऊ फुगारे, बाळासाहेब शेख, हरीभाऊ गांवधरे व शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments