Hot Posts

6/recent/ticker-posts

राहुल कवडे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड; राजे प्रतिष्ठान - कामगार सेनेत नवे नेतृत्व

 राहुल कवडे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

 राजे प्रतिष्ठान - कामगार सेनेत नवे नेतृत्व

पुणे (कटूसत्य वृत्त):- श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या राजे प्रतिष्ठान – कामगार सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी राहुल कवडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

या निवडीबद्दल संघटनेचे संस्थापक खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जितेंद्र खानविलकर, उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, संघटक प्रमुख अशोक शिगवण, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके, खजिनदार नारायण कोळी तसेच परीक्षित खुने सहसचिव महाराष्ट्र राज्य यांनी राहुल कवडे यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संघटनेच्या माध्यमातून कामगार आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी प्रभावी कार्य करत असलेल्या राजे प्रतिष्ठान – कामगार सेनेच्या पुणे जिल्ह्यातील नेतृत्वाची जबाबदारी आता राहुल कवडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल कवडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही फोल ठरवणार नाही. कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देणे, संघटनेचा झेंडा खंबीरपणे पुढे नेणे, हीच माझी प्राथमिकता असेल.”

या निवडीमुळे पुणे जिल्ह्यात राजे प्रतिष्ठान – कामगार सेनेच्या कार्याला नवे बळ मिळेल, असे संकेत मिळत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments