Hot Posts

6/recent/ticker-posts

हर्षवर्धनराजे व स्वामिनीराजे भोसले यांच्या हस्ते महापूजा संपन्न

 हर्षवर्धनराजे व स्वामिनीराजे भोसले यांच्या हस्ते महापूजा संपन्न




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५ चे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा, आरती व घटस्थापना चि. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु.स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. आई राजा उदो उदो...! सदानंदाचा उदो उदो...! च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने महापूजा व घटस्थापना संपन्न झाली. आरती नंतर उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले. चि. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांचा सत्कार न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, रोहन शिर्के, सागर पवार, नामा भोसले, अप्पा हंचाटे, राजेंद्र काटकर, बाबुशा महिंद्रकर, स्वामिनाथ बाबर, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, तानाजी पाटील, राजू पवार, महांतेश स्वामी, सिद्धराम कल्याणी, बलभीम पवार, प्रकाश माने, धानप्पा उमदी, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, विशाल घाटगे यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments