राजकारणात संयम महत्त्वाचा असतो - खा. मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- राजकारणात संयम महत्वाचा असतो, त्यात कुठे थांबायचे हे कळणारा माणूसच जीवनात यशस्वी होतो असे मत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
अकलूज येथील उदय सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्युट मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅण्ड टेक्नॉलॉजी व विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास केंद्र पीएम उषा योजने अंतर्गत पाच दिवसांची कौशल्य विकास मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी राजकीय नेतृत्वामधील कौशल्याची संधी या विषयावर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. केदारनाथ काळवणे व डॉ. राजेंद्र वडजे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, संचालक श्रीकांत राऊत, नितीन बनकर, ईशितादेवी मोहिते-पाटील यांच्यासह सोलापूर व सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. भारत साठे यांनी केले तर आभार डॉ. विश्वनाथ आवड यांनी मानले.
0 Comments