Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथील प्रा. विजया खराडे यांना डाॅक्टरेट प्रदान

अकलूज येथील प्रा. विजया खराडे यांना डाॅक्टरेट प्रदान



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका प्रा. विजया जयाप्पा खराडे यांना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, यांची डाॅक्टरेट प्रदान करण्यात आली.
त्यांनी प्राणीशास्त्र या विषयात पीएचडी साठी जलजीवशास्त्र विषयातील, या संशोधनामध्ये तळ्यातील जलजीव, पाण्याचे भौतिक -रासानिक गुणधर्म आणि यांच्यातील ऋतुनुसार सहसंबंध याचे संशोधन केले आहे.माळशिरस तालुक्यामध्ये तळ्यातील पाणी हे जास्त कृषी क्षेत्रात व्यवसाय आणि घरगुती कामासाठी वापरले जाते. जलाशयाचे पर्यावरणीय संतुलन टिकवण्यासाठी आणि पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे सौंदर्य जपण्यासाठी संशोधन केले. सदर पीएच.डी साठी त्यांना मार्गदर्शन शंकरराव मोहिते महाविद्यालयातील डॉ. सुधा बनसोडे यांचे लाभले.
खराडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव सहसचिव, शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.


Reactions

Post a Comment

0 Comments