कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रगतशील द्राक्ष व केळी बागेस भेट
बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी दीक्षारंभ कार्यक्रमांतर्गत नुकत्याच प्रथम वर्षामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रगतशील बागायतदार मा. धनराज शिंदे यांच्या शेतावरती प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्षांच्या विविध जातींची लागवड,केळी लागवड, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था तन नियंत्रण, खत व्यवस्थापन, कीड व पीक व्यवस्थापन याबद्दल प्रगतशील शेतकरी श्री. नितीन (बापू) कापसे यांनी याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली भविष्यामध्ये कृषी मधील संधी फळबाग लागवडीचे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या भेटीचे नियोजन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. संतोष शेंडे, डॉ. महेश गुरव प्रा.शितल शेळके कृषी सहाय्यक पूजा मोठे आधी उपस्थित होते.
0 Comments