अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली
आ. समाधान आवताडे यांनी केली पाहणी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पंढरपूर तालुक्यातील बोहाळी उंबरगाव परिसरास रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले. या परिसरातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले.
तरीही हजारो एकर पिकातून पाणी साठून राहिले. या परिस्थितीची पाहणी संवेदनशील व कर्तव्यदक्ष आ. समाधान आवताडे यांनी सोमवारी सकाळी केली. त्यांच्यासमवेत तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे ,महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी सोबत होते.
पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव, बोहाळी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस, डाळिंब, बोर, मका यासह इतर शेती पिकांची पाहणी केली. याप्रसंगी आ. समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली.
आ. समाधान आवताडे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना सोबत असलेल्या तहसीलदारांना केल्या.
आ. समाधान आवताडे यांच्या गाड्यांचा ताफा, जसा जसा पुढे जात होता, तसं तसे शेतकरी रस्त्यावर येऊन उभा राहत होते. शेत पिकांचे झालेले नुकसान दाखवत होते. ओढ्यातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमधून साठले होते. या सर्व परिस्थितीची पाहणी आ. समाधान अवताडे यांनी केली. उंबरगाव आणि बोहाळी येथील काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसले होते, याबाबत तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.
0 Comments