शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील वैराग दहिटणे मुंगशी तडवळे महसूल मंडळातील गावांचा दौरा खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर व बार्शीचे आमदार श्री दिलीप सोपल साहेब यांच्या समवेत करण्यात आला असून यात वैराग मंडळातील दाहिटणे (ता. बार्शी) येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यात आली आहे पाहणी वेळी बार्शी विभागाचे उपविभागीय अधिकारी पडदुने , तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तसेच महसूल मंडळातील अधिकारी समवेत पाहणी करण्यात आली आहे
या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे झालेले नुकसान, पशुपालनावरील परिणाम याबाबत दोन्ही जनप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. “आम्ही पेरलेले कांदा, सोयाबीन, बाजरी, तूर , उडीद मूग आदी पिके पाण्याखाली गेल्याने पूर्णपणे नष्ट झाले आहे. उर्वरित पिकांमध्येही रोगराई पसरत असून उत्पादनावर गंभीर परिणाम होईल,” असे शेतकऱ्यांनी सांगितले.
खासदार निंबाळकर व आमदार सोपल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की – नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी. शासनाने ठरवलेले मदतीचे निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार दिलीप सोपल साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे बाबत प्रशासनाने आपल्या स्तरावर लवकर हालचाली सुरू करून शेतकऱ्यांना मदत करावी अशा सूचना प्रशासनास दिल्या असून अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने साहाय्य करावे असे सुतोवाच केले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

0 Comments