मराठा आंदोलक 'नजर कैदेत '
आ. कोठेंनी घडवली मंत्र्यांची भेट; आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निवेदन
सोलापूर : (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील नकारात्मक भूमिका घेत आहेत. त्यामुळे रविवार (दि. ३१) रोजी सोलापूर दौऱ्यांवर आलेल्या मंत्री पाटील यांच्या गाडीचा ताफा आडवून जाब विचारण्याच्या तयारीत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा सुगावा पोलिसांना लागताच या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजर कैदेत ठेवले. अखेर आ. देवेंद्र कोठे यांनी योग्य समन्वय साधत आंदोलक आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घडवून दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यांवर आले आहेत. पंढरपुरात मराठा समाजास ओबीसीमधून
आरक्षण देणे शक्य नाही, असे विधान केल्यामुळे मराठा समाजामध्ये त्यांच्या विषयी मोठी नाराजी आहे. त्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत नकारात्मक भूमिका घेत वेगवेगळी विधाने करत आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या गाडीचा ताफा आडवून जाब विचारण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र या आंदोलनाचा सुगावा फौजदार चावडी पोलिसांना लागला. संभाजी बिग्रेडच्या या आंदोलनकांना दुपारी दोन वाजल्यापासून ताब्यात घेऊन नजर कैदेत ठेवले.
संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, गणेश कदम, प्रशांत देशमुख, शेखर भोसले यांचा समावेश होता. मंत्री चंद्रकांत पाटील सायंकाळी आ. देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात आल्यानंतर श्याम कदम यांनी आ. कोठे यांच्याशी संपर्क साधत मंत्र्यांना भेटण्याची विनंती केली असता आ. कोठे यांनी पोलीस प्रशासनास योग्य समन्वय साधत संभाजी बिग्रेडचे कार्याकर्ते यांच्या भेट घडवून दिली. यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशी विधाने करू नये, अशी मागणी केली.
चौकट
मागण्यांचे निवेदन सादर संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश
ननवरे, सचिन चव्हाण, सदाशिव पवार, श्रीनिवास सावंत यांनी नेतृत्वाखाली सोलापूर दौऱ्यांवर
आलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप कार्यालयात भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन दिले.
0 Comments