मनोज जरांगेचा सरकारला इशारा
मुंबई,(कटूसत्य वृत्त):-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज
जरांगे यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू असून रविवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. दरम्यान, या आंदोलनाबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्यामुळे जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. उद्यापासून (सोमवार) आणखी कडक उपोषण करणार असून आता पाणी घेणेही बंद करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तुम्हाला काय करायचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत. तसेच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज घरी राहत नसतो. हे लक्षात ठेवा. आपण जे बोलतो तो करतो. तुम्ही फक्त पुढील मरा चंद्रकांत पाटील यांनी मनोज शनिवारी आणि रविवारी पाहा. उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार आहे. आता उद्यापासून पाणी पिणेदेखील बंद करणार आहे. मंत्री फक्त बैठका घेतात, आरक्षण देत नाहीत, मंत्री भंगार आहे, असा गंभीर आरोप जरांगेनी याप्रसंगी केला.
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
राजकीय आरक्षणासाठी सर्व धडपड सुरू आहे, अशी टीका जरांगेच्या आंदोलनाचा उल्लेख करताना केली. याचाही समाचार जरांगे यांनी घेतला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या शिव्या खाऊ नयेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमच्या दाखल्याच्या पडताळणी रोखून धरल्या होत्या. त्यामुळे येथून पुढे त्यांनी जास्त बडबड करू नये.
आंदोलनाच्या नावाने पैसे मागणान्यावर जरांगे संतापले
कुणी रेनकोट, कुणी ज्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. समाजाच्या नावाने कमवत आहेत. रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. हे मी शेवटचे सांगतोय. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाही. फक्त गरिबांची सेवा करा. काही लोक समाजाला मदत करायचे सोडून पैसे छापायला बघत आहेत, असेही जरांगे म्हणाले..
राज ठाकरे आणि नितेश राणेंवर हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राज यांनी जरांगेच्या आंदोलनाबद्दल सर्व स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेव देऊ शकतात, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी एकेरी शब्दांत राज ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला. राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
जरांगे म्हणाले, की राज्यातल्या समाजाचे म्हणणे आहे की, ते दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो, आम्ही कधी तुम्हाला विचारले का की, ११ ते १३ आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्यानंतर तुम्ही आमच्या मराठवाड्यात कधी आलात? पुण्यात
किंवा नाशिकमध्ये तुम्ही किती वेळा जाता ? फडणवीसांनी एकदा लोकसभेला तुमचा गेम केला, विधानसभेला तुमच्या मुलाला पाडले, तरी तुम्ही त्यांचीच री ओढता. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेला पोरगा आहे. त्यांच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेले, सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्यांना चालते. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात.
यावेळी जरांगेंनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही टीका करताना त्यांचा उल्लेख चिचुंद्री असा केला. ते म्हणाले, चिचुंद्रीचे कधी पाय मोजता येत नाहीत. तिचा पायाचा मेळ लागत नाही. ती सर्व ऋतूत लाल असते आणि ती काय म्हणते हे कोणालाच समजत नाही. आंदोलन एकदा संपू द्या, मग नितेश राणेंना मी उत्तर देतोच.
0 Comments