Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आंदोलकांसाठी मोडनिंब परिसरातून जेवण

 मराठा आंदोलकांसाठी मोडनिंब परिसरातून जेवण



मोडनिंब / (कटूसत्य वृत्त):-     मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे - पाटील यांचे
आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या मराठ्यांना जेवणाची सोय व्हावी यासाठी मोडनिंब परिसरातून 'शिदोरी' म्हणून अन्नसामग्री जमा करून विशेष वाहन करून मुंबई येथे पोहोच करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे आणि मोडनिंब शिवसेना गटप्रमुख (उबाठा) दीपक सुर्वे यांनी दिली.
मोडनिंबसह परिसरातील बावी, अरण, पडसाळी, जाधववाडी, बैरागवाडी, गिड्डेवाडी, उंबरे, सोलंकरवाडी, तेलंगवाडी या गावातील मराठा बांधवांनी 'शिदोरी' म्हणून भाकरी, फरसाण, शेंगाचटणी,
ठेचा, बिस्किट, चिवडा, पाण्याच्या बॉटलचे बॉक्स यासह इतर खाद्य वस्तू जमा करण्यासाठी प्रयत्न केले.
बावी येथे दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, महावीर मोरे, शितल मोरे, बाळासाहेब मोरे, मुन्ना सुर्वे, महादेव चव्हाण, राहुल पवार, विशाल रोकडे, देविदास मोरे, रमेश मुसळे, रसूल मुलाणी यांच्यासह अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन अन्नसामग्री जमा करण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात चिवडा तयार करून त्याची पॅकेट बनवून तसेच पाण्याच्या बाटल्या असा अन्नपुरवठा तयार करून विशेष वाहनाने मुंबईला पाठवला.
मोडनिंब येथे मोडनिंब शिवसेना (उबाठा) गटप्रमुख दीपक सुर्वे यांच्या कार्यालयात अन्नसामग्री जमा करण्यात आली. अन्नसामग्री देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. अजित चोपडे,
दशरथ गिड्डे, प्रथमेश शिंदे, पृथ्वीराज सुर्वे, धनंजय सुर्वे, भूषण जाधव, अनिल हंबिरे, वैभव चव्हाण, सोमनाथ सुर्वे, माऊली हागे, विकास देवकुळे, यशराज धनंजय सुर्वे यांनी एकत्रित अन्नसामग्री जमा करण्यासाठी परिश्रम घेतले. विशेष वाहनाने ही अन्यसामग्री मुंबईला पाठवण्यात आली.
Reactions

Post a Comment

0 Comments