Hot Posts

6/recent/ticker-posts

विचारांची लढाई लढू न शकणारी गोडसेची औलाद, गांधींना गोळी घालण्याची धमकी देत आहेत- नरोटे

 विचारांची लढाई लढू न शकणारी गोडसेची औलाद, गांधींना गोळी घालण्याची धमकी देत आहेत- नरोटे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी न्यूज 18 केरळ वाहिनीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना “राहुल गांधी यांच्या छातीवर गोळी झाडली जाईल” अशी थेट जिवे मारण्याची भीषण धमकी दिली. या घटनेविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट असून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

हे आंदोलन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन, सोलापूर येथे पार पडले. यावेळी परिसरात “राहुल गांधींना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपचा निषेध असो, राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, मोदी सुन ले हम नहीं डरेंगे, संघी दंगी होश में आओ, पहले लड़े ते गोरों से अब लड़ेंगे चोरों से, मोदी तेरी हिटलर शाही नहीं चलेगी” अशा घोषणा जोरजोरात देण्यात आल्या.

यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील व तहसीलदार दिनेश पारघे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष नरोटे म्हणाले की, राहुलजी गांधी यांना गोळ्या घालण्याचे “हे विधान निष्काळजीपणाने किंवा भाषेचे घसरलेले वाक्य नसून थंड, नियोजनबद्ध व अंगावर काटा आणणारे आहे. या धमकीमुळे केवळ विरोधी पक्षनेनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेलाच धोका नाही, तर आपल्या संविधान, कायद्याचे राज्य आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात झाला आहे.”

केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेविषयी आधीच वारंवार इशारे दिलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच सुरक्षेशी संबंधित पत्राची प्रत काँग्रेस अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेली असताना ती माध्यमांत लीक झाली. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची थेट हत्या-धमकी देणे हे एक भीषण कटकारस्थान असल्याचे स्पष्ट होत आहे.

“ज्यांचा आदर्शच दहशतवादी गोडसे आहे, ते विचारांची लढाई लढू शकत नाहीत. म्हणूनच विरोधकांना ठार मारण्याच्या कुरापती रचल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा संघर्ष हा विचारांचा आहे — लोकशाही व संविधान वाचविण्याचा आहे. पण भाजपचे प्रवक्ते व नेते धमक्यांचा आधार घेत आहेत, हीच त्यांच्या विचारशून्यतेची साक्ष आहे.”

आज राहुल गांधी संसदेत आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी कोट्यावधी जनतेचा आवाज बनून महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, महिला आदींचे प्रश्न मांडत आहेत. या संघर्षामुळे भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकत असून त्यांचा खोटा प्रचार उघडा पडत आहे आणि वोट-चोरीच्या कारस्थानाचा फर्दाफाश झाला आहे. त्यामुळेच आता ते राजकीय प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याच्या धमक्यांचा मार्ग अवलंबत आहेत,

याशिवाय, सोशल मीडियावर देखील राहुल गांधींविरुद्ध मृत्यूच्या धमक्या व हिंसक मजकूर प्रसारित होत असून त्याचा अप्रत्यक्ष संबंध भाजपशी जोडला जात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे देशाच्या सार्वजनिक जीवनाला विषारी करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा मिळत असल्याचे गंभीर आहे.

“राहुल गांधी हे सेवाभाव, लोकशाही मूल्ये आणि भारताच्या विविधतेवरील निष्ठेचे प्रतीक आहेत. त्यांच्या कुटुंबाने राष्ट्रासाठी महान बलिदान दिले आहे. स्व. इंदिरा गांधींनी १९८४ मध्ये व स्व. राजीव गांधींनी १९९१ मध्ये प्राणांची आहुती दिली. त्यामुळे राहुल गांधींना दिलेली धमकी ही केवळ एका व्यक्तीवरील नसून लोकशाहीच्या आत्म्यावर थेट हल्ला आहे.”

त्यामुळे, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, मा. नगरसेवक विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, परवीन इनामदार, हारून शेख, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस शकील मौलवी व श्रीशैल रणधीरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, युवक मध्य अध्यक्ष वाहिद बिजापूरे, युवक उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, अब्दुल खलीक मुल्ला, अनुसूचित जाती अध्यक्ष मयूर खरात, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अंबादास गुत्तीकोंडा, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, शोहेब महागामी, लखन गायकवाड, परशुराम सातारेवाले, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, करिमुनिसा बागवान, भीमराव शिंदे,  तोशिफ शेख, रुस्तुम कंपली, नूर अहमद नालवार, कुणाल गायकवाड, विवेक कन्ना, सुनील सारंगी रजाक कादरी, बाबू विटे, राजन परदेशी, सुदर्शन अवताडे, महेंद्र शिंदे, आशुतोष वाले, शिवाजी साळुंखे, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, रुकैयाबानू बिराजदार, छाया हिरवटे, आदित्य म्हमाणे, व्यंकटेश बोम्मेन, अभिषेक गायकवाड, श्रीनिवास परकीपंडला, नागनाथ शावणे, अयान नाडेवाले, रियाज नाईकवाडी, अजीम शेख, मेघा बनसोडे, मारता रावडे, अलिमा शेख, विजय बालनकर, महीबुब शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments