Hot Posts

6/recent/ticker-posts

पूरग्रस्तांना पुरामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून भरपाई मिळणार

 पूरग्रस्तांना पुरामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी शासनाकडून भरपाई मिळणार


पालकमंत्री गोरे


सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील गौडगाव परिसरात अतिवृष्टी  पुरामुळे खूप मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील पिके, फळबागा तसेच वाहून गेलेल्या जमिनी, घरांचे, घरातील अन्नधान्यांचे झालेले नुकसान यांचा समावेश भरपाईमध्ये करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे ग्राम विकास  पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकसानग्रस्तांना दिले.

आज सकाळपासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बार्शी तालुक्यातील गौडगावजामगाव पा., उपळेधुमालेहिंगणीमळेगाव  बावी या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली  येथील नागरिकांचे संवाद साधून त्यांना धीर दिलायावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटीलमाजी आमदार राजेंद्र राऊत,

प्रांताधिकारी सदाशिव पडदुणेबार्शी तहसीलदार एफ.आरशेखमाजी सभापती अनिल डिसले,  मदन दराडेमाजी सभापती केशव घोगरेसंतोष निंबाळकरप्रमोद वाघमोडे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे यांनी बार्शी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे  पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केलीहिंगणी येथील द्राक्ष फळबागाच्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे त्यांनी सूचित केले आहेनुकसानग्रस्तांनी धीर धरावाशासन पूर्णपणे पाठीशी असून लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितलेया आपत्तीच्या काळात प्रशासनाने ही चांगले काम केलेले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करणेतसेच त्यांना त्या ठिकाणी फूड पॉकेटपाणी वेळेत देणे महत्त्वाचे होते.

गौडगाव येथील शिरवळकर कुटुंबातला मुलगा रामेश्वर केशव शिरवळकर पुराच्या पाण्यात मृत्यू पावलेला होतात्या कुटुंबाचे सांत्वन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन केलेतसेच शिरवळकर कुटुंबाला शासनाच्या वतीने तात्काळ मदत म्हणून चार लाखाचा धनादेश देण्याचे निर्देश दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments