Hot Posts

6/recent/ticker-posts

भीमा कारखान्याकडून उर्वरित ऊस बिल २८०० रु. प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- चेअरमन विश्वराज महाडिक

 भीमा कारखान्याकडून उर्वरित ऊस बिल २८०० रु. प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- चेअरमन विश्वराज महाडिक




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- भीमा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन २८०० रुपये याप्रमाणे उर्वरित ऊस बीलाची रक्कम सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडीक यांनी दिली आहे.

भीमा कारखान्याकडे इथेनॉल आणि डिस्टिलरी प्रकल्प नसूनही भीमाने आजवर उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर दिला आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा येणारा गळीत हंगाम सक्षमपणे सुरू करून या हंगामातही भीमा कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला सर्वांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments