Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानांतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘स्वस्थ नारीसशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाची सुरुवात १६ सप्टेंबरपासून करण्यात आली आहे. या अभियानाच्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र कडबगाव येथे किशोरवयीन मुलीबालके आणि महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

              या शिबिरात पोषण संवादविविध आजारांची तपासणीसमुपदेशन आणि बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारीएकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवण्यात आले.

 

          शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जेऊर ग्रामपंचायतचे सरपंच पार्वती संपलेउपसरपंच काशिनाथ पाटीलकडबगावचे सरपंच शिवलीला पाटीलक्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादवअंगणवाडी पर्यवेक्षिका भाग्यश्री कुलकर्णीप्रज्ञा मोरे आणि कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे उपस्थित होते.

 

             केंद्रीय संचार ब्युरोचे अंबादास यादव यांनी पंतप्रधान मातृत्व वंदन योजनालसीकरणपोषण अभियानसुकन्या समृद्धी योजना आणि उज्ज्वला गॅस योजना यांची माहिती दिली. यावेळी १२ अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून गरोदर आणि स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. सुदृढ बालकांना गौरविण्यात आले.

 

            सेविका आणि मदतनीस यांनी घरगुती धान्यांपासून पोषक आहाराची प्रात्यक्षिके सादर केली. उत्कृष्ट मांडणी करणाऱ्या सेविका व मदतनीस यांना पारितोषिके देण्यात आली. पोषण मूल्याची माहिती देण्यासाठी ‘पोषण गुढी’ उभारण्यात आली.

 

           सदर आरोग्य तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विन करजखेडेवैद्यकीय अधिकारी डॉ गजानन मरकडसमुदाय आरोग्य अधिकारी डॉ भाग्यश्री राऊतडॉ सुरेखा बिराजदार यांच्या वतीने करण्यात आले.

 

तपासणी तपशील पुढीलप्रमाणे:

 

🔹 प्राथमिक आरोग्य केंद्रजेऊर

•           गरोदर माता तपासणी – ३५

•           हिमोग्लोबिन तपासणी – २८३

•           मधुमेह तपासणी – २८०

•           रक्तदाब तपासणी – २८०

•           कॅन्सर तपासणी – २५९

•           टीबी तपासणी – १४

•           किशोरवयीन मुली समुपदेशन – २८३

•           आभा कार्ड वितरण – १२

•           एकूण लाभार्थी – ३२९

 

🔹 उपकेंद्रकडबगाव

•           गरोदर माता तपासणी – २२

•           असंसर्गजन्य आजार तपासणी (पुरुष) – २२

•           असंसर्गजन्य आजार तपासणी (महिला) – ६५

•           हिमोग्लोबिन तपासणी – ९५

•           एकूण लाभार्थी – १७५

 

या तपासणीसाठी परिचारिका तजबी बिराजदारआरोग्य सेवक विरेश कोळीरेखा बुटाळेआशाताई शिरीन मियादेरेणुका तलवार आणि सारिका राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Reactions

Post a Comment

0 Comments