पालकमंत्री फक्त शहरापूरते नाहीत, जिल्ह्यात देखील लक्ष द्या
खा. प्रणिती शिंदे आयुक्तांवर भडकल्या, 'सोलापूर शहर कधीच तुंबले नव्हते,आत्ताच कसं काय तुंबले?'
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अतिवृष्टीमुळे सोलापूरकरांची दयनीय अवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीचा जबर फटका बसला आहे. कधीच सोलापूर शहर इतक्या मोठ्या प्रमाणात तुंबले नव्हते. आत्ताच कसं काय तुंबले? असा जाब विचारत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदें महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडून बसल्या होत्या. नॅशनल हायवेला चिटकून असणाऱ्या नागरी वसाहतीत पावसाचे पाणी शिरले असा अहवाल पालिका आयुक्तांनी दिला होता. त्यावर खासदार प्रणिती शिंदें पालिका आयुक्तांना सांगितले, यात नॅशनल हायवे प्राधिकरणचा काहीही संबंध नाहीय. सर्व दोष महानगरपालिका प्रशासनाचा आहे. याचं उत्तर मला द्या, असा जाब विचारत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदें भडकल्या.
खासदार प्रणिती शिंदे यांनी यानंतर माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील टीका केली आहे. "पालकमंत्री फक्त शहरापूरते नाहीत. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्हाभरात शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. त्याकडे देखील लक्ष द्या", असे सांगत प्रणिती शिंदेंनी विरोधकांचे कान टोचले आहे.
सकाळी जयकुमार गोरे तर दुपारी प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी
सोलापूर शहरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेळगी, मित्र नगर, सोरेगाव, विडी घरकुल, दहिटने आदी भागात असलेल्या नागरी वसाहतीना बसला आहे. सर्वसामान्य नागरीक राहत असलेल्या अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या नागरी वसाहतीत जाऊन पाहणी केली. तर दुपारी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी केली.
प्रणिती शिंदे यांची पालकमंत्र्यांवर टीका
"सोलापूर शहरात अतिवृष्टी झाली. येथील राजकीय मंडळी ताबडतोब पाऊस थांबल्यानंतर मदतीला जायला पाहिजे होते. पालिकेचे काही अधिकाऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला.पालकमंत्री मात्र 24 तासानंतर सोलापुरात येतात आणि एका विधानसभा मतदारसंघा पुरता दौरा करतात हे चुकीचे आहे.पालकमंत्री हे संपूर्ण जिल्ह्याचे असतात, त्यांनी जिल्हाभरात दौरे करायला पाहिजे", अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
.png)
0 Comments