Hot Posts

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा

सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत शहर भाजपतर्फे सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवडयात विविध उपक्रम राबविणार येणार असल्याची माहिती शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी डॉ. शिवराज सरतापे, सहसंयोजकपदी अनिल कंदलगी, दत्तात्रय पाटील, राम वाकसे, सोशल मीडिया प्रतिनिधीपदी योगेश गिराम, सहप्रतिनिधी म्हणून संदीप कुलकर्णी यांची निवड करण्यात आल्याचेही तडवळकर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची माहिती यांनी सांगितले.
सेवा परमो धर्मः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुढे नेत या अभियानांतर्गत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण (एक पेड़ माँ के नाम), रक्तदान शिविर, युवा मोर्चाच्या नेतृत्वात मोदी विकास मॅरेथॉन, दिव्यांग सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वितरण व माहितीपटाचे प्रदर्शन, प्रबुध्द संमेलन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त बूथ स्तरावर अभिवादन तसेच २५ सप्टेंबर रोजी बूथ कार्यकत्यांच्या समवेत त्यांच्या घरी भोजन तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पांजली खादी वस्तूंची खरेदी करणे व नागरिकांना घेण्यास प्रेरित करणे या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
सेवा पंधरवडा शहरामध्ये राबविण्याच्या अनुषंगाने भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची कार्यशाळा गुरुवार ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सारस्वत मंगल कार्यालय डफरिन चौक येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विनम्र अभिवादन सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व ८ मंडलांमध्ये या कालावधीत सेवा उपक्रम राबविले जाणार आहेत.
या सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत विश्वगुरू भारत या  संकल्पनेला बळ मिळेल. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वदेशी मूल्यांवर आधारित सेवा कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा शनिवार, २० सप्टेंबर रोजी वाढदिवस असून हा दिवस विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे, असेही डवलकर यांनी सांगितले. 
पत्रकार परिषदेला सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पांडुरंग दिडी, विशाल गायकवाड, डॉ. शिवराज सरतापे आदी उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments