Hot Posts

6/recent/ticker-posts

साईकृपा पतसंस्थेच्या ठेवी व गुंतवणुकीत सातत्याने वाढ : कैलास बरडकर

 साईकृपा पतसंस्थेच्या ठेवी व गुंतवणुकीत सातत्याने वाढ : कैलास बरडकर 




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहरांमध्ये अनेक पतसंस्था बँका आहेत नवीन येतात या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकून राहणे हे सर्वात मोठे यश आहे. ठेवीदार, कर्जदार, सभासद या सर्वांचा विश्वास संस्थेने संपादन केला आहे. संस्था सुरक्षित असून ठेवीदारांना अडचणीच्या वेळी संस्था अर्ध्या रात्री पैसे देऊ शकते. संस्थेमध्ये ५ कोटी ५१ लाख ठेवी व गुंतवणूक १ कोटी ३८ लाख, कर्ज वाटप ४ कोटी तर नफा ४ लाख २० हजार झाला आहे. संस्थेला २१ वर्ष पूर्ण झाली असून ठेवी मध्ये कर्जदार व गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन कैलास बरडकर यांनी व्यक्त करून सभासदांना १२  टक्के लाभांश जाहीर केला.
             ते साईकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. यावेळी माजी आमदार अँड. रामहरी रुपनवर, अँड.बी.वाय.राऊत, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी सरपंच अमरशील देशमुख, शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, उत्तम बरडकर, सुरेश पांढरे, लेखा परिक्षक अनिल खटावकर, पतसंस्थेचे मार्गदर्शक किशोर बरडकर संचालक अभिजीत घुगरदरे, गणेश बरडकर, सुपार्श्वनाथ शहा, दिपक दळवी, सतिश कुटे, जितेंद्र दोशी, सेक्रेटरी निलेश पोतदार, कॅशियर पोपट मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.  पतसंस्थेचे सेक्रेटरी निलेश पोतदार यांनी अहवाल वाचन केले. आभार सुपार्श्वनाथ शहा यांनी मानले.
सर्वसाधारण सभेसाठी नातेपुते येथील व्यापारी वर्ग पतसंस्थेचे संचालक मंडळ, सभासद, कर्जदार, ठेवीदार व पिग्मी एजंट उपस्थित होते. 

चौकटीत :
नातेपुते शहरात पतसंस्थेची संख्या जास्त आहे. नॅशनल बँका आल्या आहेत आणखी येत आहेत. पतसंस्था चालविण्यासाठी चांगले कर्जदार पाहिजेत. संकटे येतात तेवढेच मार्ग असतात. संघर्षाशिवाय काही मिळत नाही. संस्था ही आपल्या अपत्यासारखी असते. तिला जिवंत ठेवले पाहिजे. केंद्र शासनातील होणारे बदल पतसंस्थेला माहिती पाहिजेत. दिलेले कर्ज वसूल करण्याचे शास्त्र पतसंस्थांना माहिती असल्याने नातेपुते येथे पतसंस्थेची संख्या जास्त

अँड. रामहरी रूपनवर ( माजी आमदार )

Reactions

Post a Comment

0 Comments