साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे पुरस्कार जाहीर
शिक्षक व शाळा यांचा होणार गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पतसंस्थेचे संचालक सुनिल चव्हाण यांनी दिली.
रविवार १४ सप्टेंबर रोजी अरकाल गार्डन व फंक्शन हाॅल,पद्मनगर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.सिद्वेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने यांच्या शुभहस्ते तर प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.गुरुनाथ वांगीकर, राम गायकवाड,आप्पासाहेब पाटील,सोमेश्वर याबाजी,अनिल गायकवाड,अ.गफुर अरब,राजेंद्र कुलकर्णी व वल्लभ चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.साने गुरुजी शिक्षक पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे,उपक्रमशील मुख्याध्यापिका हेमावती मिठ्ठा ( कै.व्य.वि.सिंगम प्राथमिक शाळा), उपक्रमशील शिक्षक—किरण साळुंके( राजराजेश्वरी प्राथमिक शाळा),आफ्रीन तारानाईक( ज्ञानगंगा प्राथ.शाळा),सेवाभावी सेवक—नेताजी रणपिसे (गोपाळ प्राथमिक विद्यालय) साने गुरुजी आदर्श शाळा पुरस्कार कै.वि.मो.मेहता प्राथमिक शाळा.पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमास सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन मुरलीधर कडलासकर,सचिव आप्पाराव इटेकर,उपाध्यक्ष जयंत गायकवाड,महादेवी पाटील,विरभद्र यादवाड,विनोद आगलावे,सुनिल चव्हाण, ,भिमराया कापसे,सचिनचौधरी,भाऊसाहेब मोरे,उल्हास बिराजदार,धनाजी मोरे,शिवानंद हिरेमठ व फरजाना रचभरे यांनी केले आहे.
0 Comments