स्वप्न पेरलं बापनं
-----------------------------------------------
स्वप्न पेरलं बापनं
काळ्या आईच्या ओटी ला,
लावून आस निसर्गावर
पोट गेलं त्याच पाठीला ..
रोग पिकावर हसला
दलाल छातीवर बसला,
झिजवून आयुष्याला रं
घाम त्या मातीवर कसला..
ओल्या कोरड्या दुष्काळानं
घोट नरडीचा घोटीला ..1)
स्वप्न पेरलं बापनं
काळ्या आईच्या ओटी ला
लावून आस निसर्गावर
पोट गेलं त्याच पाठीला ..
उभ्या उन्हात करपून
झुंज नशिबाशी खेळतो ,
भुक भागवण्या जगाची
देह तो पोशिंदा जाळतो..
स्वप्न बांधला फाटक्या
आपल्या कपड्याच्या गाठीला..2)
स्वप्न पेरलं बापनं
काळ्या आईच्या ओटी ला
लावून आस निसर्गावर
पोट गेलं त्याच पाठीला ..
भाव किंमतीत घसरला
हात संसारासाठी पसरला,
पाहून राख स्वप्नांची
बाप जगणं तो विसरला..
जुगार त्याचा निसर्गाशी
आशेने दुःखात दाठीला..3
स्वप्न पेरलं बापनं
काळ्या आईच्या ओटी ला
लावून आस निसर्गावर
पोट गेलं त्याच पाठीला ..
-----------------------------------------------
रचनाकार: रामप्रभू गुरुनाथ माने.
सोलापूर.मो,9850236045
0 Comments