Hot Posts

6/recent/ticker-posts

पासलेवाडी येथे कृषिमंत्र्यांची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

 पासलेवाडी येथे कृषिमंत्र्यांची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- तालुक्यातील पासलेवाडी गावामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीसह घरांना मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी गावाला भेट दिली. त्यांच्या सोबत सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी शेतीचे झालेले नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि घरात साचलेल्या चिखलामुळे उभ्या राहिलेल्या अडचणी कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. भरणे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या व तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे आश्वासन दिले.


या वेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनीही शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. अधिकाऱ्यांना मदत कार्य वेगाने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले.

गेल्या काही दिवसांत मोहोळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तत्काळ मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Reactions

Post a Comment

0 Comments