Hot Posts

6/recent/ticker-posts

भीमा कारखान्याच्या२०२४- २५ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति मे. टन २९००.०० रुपये जाहीर

 भीमा कारखान्याच्या२०२४- २५ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति मे. टन २९००.०० रुपये जाहीर





 मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भीमा मल्टीस्टेट सहकारी साखर कारखाना लि, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर या संस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने खेळी मेळीच्या वातारवणात पार पडली. सदर सभेच्यावेळी ऑनलाईन पध्दतीने सभासदांनी सहभाग नोंदवला व सभेच्या कामकाजास सुरवात झाली त्यावेळी कारखान्याचे संचालक सुनिल चव्हाण यांनी प्रथम श्रध्दांजलीचा ठराव मांडला. त्यास सर्व सभासदांनी श्रध्दांजली वाहिली व कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक  शेख के. एम. यांनी सन २०२४ - २५ च्या वर्षाचा आर्थिक ताळेबंद पत्रके व सर्व विषयांचे वाचन केले त्यांस मान्यता देणेत आली. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन विश्वराज धनंजय महाडिक यांनी अहवाल सालात कारखान्यास आलेल्या अडचणी व त्यावर मात करुन कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२४- २५ पार केला व पुढील हंगाम सन २०२५ - २६ शासनाची मान्यता मिळताच चालू करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा भरली असून मशिनरीचे काम प्रगतीपथावर असून कारखाना सात ते आठ लाख मे. टन ऊस गळीत करणार असल्याचे तसेच आपले कारखान्यास इथेनॉल व 200KLPD डिस्टलरी प्रकल्प उभा करणेकरिता शासनाची मान्यता मिळाली असून तो लवकरात लवकर उभा करणार आहे. असे सांगितले. त्यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी कारखाना आर्थिक अडचणीत येवून बैंक खाती एन.पी.ए मध्ये गेलेली असून तरी सुध्दा स्वः भांडवल गुंतवूण कारखान्यास काहीही कमी पडू देणार नाही व शेतकरी आणि कामगारांना गळीत हंगाम सन २०२५ - २६ मध्ये अडचण येवू देणार नाही व सिझन २०२४- २५ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाचे बील शेतकऱ्यांना रु. २८००.०० प्रमाणे दिलेले आहे. तरी सुध्दा कारखाना अडचणीत असताना ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला व बील देण्यास ऊशीर झाला म्हणून कारखान्यास सुरुवातीस आलेल्या ऊसास वाढीव रु. ५०.००रु. प्रति मे. टन व ज्यांचे रु. २८००.०० प्रमाणे बील देण्याचे राहिले होते अश्या शेतकऱ्यांना रु १०० प्रति मे. टन या प्रमाणे बील देण्याचे जाहीर केले.

कामगारांचा पगार थकीत आहे. त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्याचा एक ही रुपाया भी देणे थांबवणार नाही. सर्वांचे पैसे देणार आहे. सध्या कारखान्याचा ऊस गळीता करिता प्रति मे. टन रु. ४२००.०० ते ४५००.०० पर्यंत खर्च येतो व साखरेचा दर रु. ३४००.०० पर्यंतचा आहे या तफावतीमुळे पगार देणे थकले असले तरी गेला सिझन सन २०२४- २५ मध्ये कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार येत्या आठवड्या भरात देण्याचे जाहिर केले.

तसेच काही सभासदांनी कारखाना मल्टीस्टेट का केला याची विचारणा केली त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्याचे कारण सांगताना आपल्या कारखान्यास शेजारील राज्यातून गेली २ ते ३ वर्षे ऊस गळीतास येत असून त्यांना सभासद करणे गरजेचे आहे. व मल्टीस्टेट मुळे केंद्र शासनाच्या योजना राबविणे सोईचे होणेकरिता तो मल्टीस्टेट केला आहे. तो सुर्य चंद्र असे पर्यंत सहकारीच राहणार आहे. खाजगी होणार नाही, याची ग्वाही दिली. त्यापुढे बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असल्यामुळे सहकारी साखर कारखान्याची कर्जमाफी करावी असा ठराव मांडणेत आला. त्यास सभासदांनी मान्यता दिली व सोलापूर जिल्हयातील पुरग्रस्तांकरिता जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून स्वःनिधीतून ५०.०० लाखा पर्यंत मदत करण्याचे जाहिर केले. व अतिवृष्टीमुळे आजची सभा ऑनलाईन घ्यावी लागली त्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. शेवटी संचालक श्री. तात्यासाहेब नागटिळक यांनी आभार मानून सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले. सदर सभेचे सूत्रसंचालन श्री. भाऊसाहेब जगताप यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments