Hot Posts

6/recent/ticker-posts

पुराने बाधित चाळीस गावातील नागरिकांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत

 पुराने बाधित चाळीस गावातील नागरिकांचे जनजीवन सुरळीत करण्यासा       ठी प्रयत्न करावेत     



   
                                                                                                                                                                                                                                            -पालकमंत्री जयकुमार गोरे


सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी तसेच नद्यांना आलेल्या महापुरामुळे जवळपास 792 गावांना फटका बसला असून त्यातील 40 गावांमध्ये पुराचे पाणी शिरलेले होते. या 40 गावातील हजारो लोकांना निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहे. तरी या 40 बाधित गावांचे व तेथील नागरिकांचे जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी अत्यंत जबाबदारी पूर्वक काम करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री  गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, सध्या बाधित गावातील नागरिक निवारा केंद्रामध्ये राहत आहेत, परंतु आत्ता गावातील पुराचे पाणी कमी होत असून सर्व स्थानिक प्रशासनाने तसेच जिल्हास्तरीय प्रशासनाने बाधित असलेले सर्व 40 गावांचे व तेथील नागरिकांचे जनजीवन सुरळीत होऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व तातडीच्या उपायोजना राबवाव्यात. आरोग्य विभागाने सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्य शिबारे आयोजित करावीत. पाणीपुरवठा विभागाने त्या गावातील नागरिकांना तेवढा पिण्याचा पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे करावा. तसेच संपूर्ण पाणी कमी झाल्यानंतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी. सर्व ग्रामस्तरीय संबंधित विभागांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम गावाची स्वच्छता करून घ्यावी. व साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही याचीही काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरून मागवण्यात आलेल्या एकूण दहा बचाव पथकामार्फत पूर कालावधीत 4 हजार 350 नागरिकांना सुखरूप बाहेर काढून निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले. अशा 76 निवारा केंद्र मधून स्थलांतरित केलेल्या  या सर्व नागरिकांना प्रशासनाने जेवण, पाणी, आरोग्य सुविधा व अन्य अनुषंगिक बाबी उपलब्ध करून द्याव्यात. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्री  गोरे यांनी दिले. तसेच प्रशासनाने अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये खूप चांगले काम केलेले असून या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

बाधित झालेल्या 40 गावांमध्ये किती घरांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे व किती घरांचे अंशतः नुकसान झालेले आहे त्याच्या याद्या सर्व संबंधित तहसीलदार यांनी ग्रामस्तरीय यंत्रणेकडून तात्काळ तयार करून घ्याव्यात. तसेच या बाधित गावातील एकूण कुटुंबांची संख्या याचीही आकडेवारी तयार करावी. त्याप्रमाणेच बाधित गावातील जनावरांना चाऱ्याची उपलब्धता पशुसंवर्धन विभागाने तात्काळ होईल याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना  गोरे यांनी दिल्या. त्याप्रमाणेच जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील किती रस्त्यांचे नुकसान झाले याची माहिती घेऊन ते प्राथमिक स्तरावर तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही सुरू करावे. वीज वितरण कंपनीने या गावातील वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा, असे त्यांनी निर्देशित केले.

प्रशासनाने अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे अहवाल तयार करून तात्काळ सादर करावेत, असे सांगून पालकमंत्री गोरे यांनी माढा करमाळा उत्तर सोलापूर अक्कलकोट मोहोळ या तालुक्यांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच अनेक दानशूर व्यक्ती संस्था यांच्याकडून पूर बाधित नागरिकांसाठी प्रशासनाकडे मदत येत आहे. ती आलेली मदत सर्व संबंधित बाधित नागरिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाने अत्यंत चौकपणे पार पाडावी. तसेच निवरा केंद्रामध्ये नागरिकांना जेवणाची व्यवस्था करणे प्रशासनाची जबाबदारी असून यात इतर कोणावरही अवलंबून राहू नये असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेली गावे 792 असून त्यातील 40 गावांमध्ये पुराचे पाणी जाऊन घरांचे नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच या काळात 8 नागरिकांचे मृत्यू झालेले असून मयत जनावरांची संख्या 156 तर मयत कोंबड्यांची संख्या 18000 इतकी आहे तर घरांची अंशता पडझड 883 इतकी झालेली असून बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन लाख 23 हजार 661 बाधित शेती क्षेत्र एक लाख 96 हजार 561 हेक्टर इतके असल्याचे त्यांनी सांगितले. तर 4417 घरामध्ये पाणी शिरल्याची माहिती देऊन सर्व पंचनामेची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल असे सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments