माढा व बार्शी तालुक्यातील पूरग्रस्त गावांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील लव्हेगाव व म्हैसगाव बार्शी तालुक्यातील पुरी, कारीनारी या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केली. नदीकाठावरील गावे पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात बाधित झाली असून शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत लवकरच देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.
यावेळी गोगावले यांनी सांगितले की, पूर ही एक नैसर्गिक आपत्ती असून, शासन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अतिवृष्टीमुळे माढा व बार्शी तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार संजय भोसले व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शुक्राचार्य भोसले, बार्शी तहसीलदार एफ. आर. शेख तसेच शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
0 Comments