Hot Posts

6/recent/ticker-posts

गणपती या शब्दात असलेल्या गणांचे म्हणजे लोकांचे म्हणजे नागरिकांचे राज्य येईल का?

गणपती या शब्दात असलेल्या गणांचे म्हणजे
लोकांचे म्हणजे नागरिकांचे राज्य येईल का?

पुणे मनपा आकाशचिन्ह विभाग आणि पुणे पोलीस यांना आम्ही खालील प्रबोधन चित्राचे बॅनर/होर्डिंग लावण्याची परवानगी मागितलेली आहे. अजूनही परवानगी मिळालेली नाही. प्रत्येक अभिव्यक्ती ‘मतस्वातंत्र्य’ म्हणून महत्वाची आहे असे संविधान सांगते परंतु आता पोलिसच न्यायाधीश झाल्याने त्यांच्याकडे अर्ज केला आहे. कुणाची कोणतीही अभिव्यक्ती त्या अभिव्यक्त होणाऱ्या व्यक्तींचे ‘गुन्हेगारीकरण’ करेल सांगता येत नाही कारण आजकाल उथळपणे भावना दुखावणाऱ्यांच्या नजरेतून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अर्थ काढले जातात हे दुर्दैव आहे.
कायदेशीरता, पारदर्शकता व उत्तरदायित्व यांना लोकशाहीत असलेले महत्व अधोरेखित करणारी बुद्धीची देवता गणपती, लोकशाहीचा त्रिशूल घेऊन एका ईव्हीएम व्होटिंग पॅड वर पाय रोवून संविधानद्रोही प्रवृत्तीचा नायनाट करतांना या चित्रात दाखविले आहे.पोलीस आणि महानगरपालिका आकाशचिन्ह विभागाने परवानगी दिली तर या ‘प्रबोधन अभिव्यक्ती चित्राचे’ एक मोठे होर्डिंग लावायचे असे ठरवले व परवानगीची वाट बघतोय.

काही पोलीस अधिकारी, काही पालिका कर्मचारी राजकीय व धर्मांध झालेले आहेत याचा अनुभव अनेकदा येतो पण पोलीस विभागात आणि सर्वच यंत्रणांमध्ये चांगले अधिकारी आहेत हे नक्की. बघूया परवानगी देण्याची बुद्धी होते का?                                                                                                                                                                                                                                                                                                       अॅड. असिम सरोदे यांच्या फेसबुक पेज वरून

Reactions

Post a Comment

0 Comments