ब्रिजधाम आश्रम व श्री सिद्धेश्वर फिजोथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फिजिओथेरपी शिबिर संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- १० सप्टेंबर २०२५ रोजी श्री सिद्धेश्वर फिजिओथेरपी महाविद्यालय, सोलापूर येथील प्राध्यापक डॉ. टी.सुरेशकुमार, डॉ. टी. सुनीलकुमार, डॉ अरुंधती भोसले, डॉ कौस्तुभ जाधव, डॉ हर्षदा चव्हाण व विद्यार्थ्यांच्या वतीने निंबार्क ब्रिजधाम आश्रम, सोलापूर येथे सामुदायिक फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये खालील प्रमुख उपक्रम राबविण्यात आले :
फिजिओथेरपी तपासणी व उपचार दैनंदिन जीवनातील योग्य शारीरिक स्थिती व आसन (Ergonomics) याबाबत मार्गदर्शन समूह व्यायामाचे प्रात्यक्षिक व सहभाग सल्ला व समुपदेशन सेवा
या शिबिरामध्ये आश्रमातील रहिवासी तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. फिजिओथेरपी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती व आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करून या उपक्रमाने स्थानिक समाजाला मोठी मदत झाली. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, आणि विद्यार्थी व आश्रम प्रशासन यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
0 Comments