Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील एस.एन.डी. स्कूलच्या विद्यार्थिनीची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड

 नातेपुते येथील एस.एन.डी. स्कूलच्या विद्यार्थिनीची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड 




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- गिरजणी तालुका माळशिरस येथील धनशैल्य विद्यालय येथे सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नातेपुते येथील एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थ्यांनी श्रुतिका जाधव हिने १४ वर्षे मुलींच्या गटात  तालुकास्तरीय पातळीवर आपली चमकदार कामगिरी सादर करून प्रथम क्रमांक पटकावला असून तिची पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन मालोजीराजे देशमुख तसेच संचालक मंडळ यांनी श्रुतिका जाधव हिचा फेटा हार घालून सन्मान केला व पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य संदीप पानसरे, उपप्राचार्य शकूर पटेल, पीआरओ मनोज राऊत, क्रीडाशिक्षक कोमल किर्दक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments